ठाणे – महानगरपालिकेच्या पिसे आणि टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिग यंत्रणेची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती आणि अन्य कामे करण्यासाठी २७ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ ते २८ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा येथील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.