शिमला (हिमाचल प्रदेश) – उत्तरप्रदेशानंतर आता हिमाचल प्रदेशामध्येही प्रत्येक भोजनालय, फास्ट फूड कॉर्नर आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या मालकांना ओळखपत्र दिले जाणार असून ते येथे लावण्यात येणार आहे. त्यासाठी नगरविकास आणि महापालिकेच्या बैठकीत सूचना देण्यात आली आहे. नगरविकासमंत्री विक्रमादित्य सिंह यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे.