विलेपार्ले – दोन अल्पवयीन (१४ आणि १७ वर्षे) भावांना चोर समजून सूरज पटवा आणि अन्य ४ जण यांनी बेदम मारहाण केली. नायडू चाळ येथे पहाटे ३ वाजता ही मुले गेली होती. ही मुले कचरा वेचणार्या त्यांच्या आजीसमवेत रहातात.
स्थानिकांनी दोघांना विवस्त्र करून त्यांचे केस कापले, त्यानंतर साखळीने बांधून परिसरात धिंड काढून त्याचे चित्रीकरण केले आणि ती चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली. यातील आरोपींनी दोन्ही मुलांना बांधून ठेवले होते. या प्रकरणी जुहू पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाही मुले त्या परिसरात पहाटे कशासाठी गेली होती ? |