SC Notice To SBI : निवडणूक रोख्‍यांच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍टेट बँक ऑफ इंडियाला बजावली नोटीस !

बँकेने रोख्‍यांची माहिती देतांना कुणी कोणत्‍या पक्षाला देणगी दिली ?, ही माहिती सादरच केली नाही !

नवी देहली – निवडणूक रोख्‍यांच्‍या प्रकरणी स्‍टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक आयोगाला सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर कर्जरोख्‍यांविषयीची माहिती दिली. यानंतर आयोगाने त्‍यांच्‍या संकेतस्‍थळावर ही माहिती प्रसारित केली; मात्र या माहितीमध्‍ये रोख्‍यांच्‍या क्रमांकांचा उल्लेख नसल्‍याने सर्वोच्‍च न्‍यायालयाने बँकेला नोटीस बजावली असून येत्‍या १८ मार्चपर्यंत त्‍यावर उत्तर मागितले आहे. हे क्रमांक नसल्‍यामुळे कुणी कोणत्‍या पक्षाला देणगी दिली ?, हे उघड झालेले नाही.

न्‍यायालयाचे म्‍हणणे आहे की, घटनापिठाच्‍या निर्णयात हे स्‍पष्‍टपणे नमूद केले होते की, निवडणूक रोख्‍यांच्‍या खरेदीचा दिनांक, खरेदीदाराचे नाव, श्रेणी यांसह संपूर्ण तपशील देण्‍यात यावा. बँकेने रोख्‍यांचे ‘युनिक अल्‍फा न्‍यूमेरिक नंबर्स’ उघड केलेले नाहीत.

संपादकीय भूमिका

या प्रकरणात स्‍टेट बँक ऑफ इंडिया लपवाछपवी करत आहे, असेच एकंदर जनतेला दिसून येत आहे !