हिंदुत्वनिष्ठांचा पुढाकार
सांगली – सांगली येथे नुकतेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या हिंदु तरुणीचे एका धर्मांधाने बलपूर्वक धर्मांतर करून विवाह (निकाह)केला होता. हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी त्या हिंदु तरुणीची धर्मांधाच्या तावडीतून सुटका करून त्या हिंदु तरुणीचे शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदु धर्मात घेतले. यासाठी हिंदु एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांनी पुढाकार घेतला. (हिंदु तरुणीला धर्मांधाच्या तावडीतून वाचवून तिला पुन्हा हिंदु धर्मात घेणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक)
१. ही हिंदु तरुणी शाळेत जात असतांना धर्मांधाने ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह (निकाह) केला होता. त्याने १०० रुपयांच्या ‘स्टॅम्प पेपर’वर (मुद्रांकावर) ‘नोटरी’ करून तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले.
२. याविषयाची तक्रार मुलीच्या आई-वडिलांनी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पाऊल उचलून मुलीच्या आई-वडिलांना मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यास सांगितली.
३. पोलिसांनी तातडीने शोधपथक पाठवली. मुलाच्या भ्रमणभाषच्या ‘टॉवर लोकेशन’वरून त्या दोघांचा ठावठिकाणा सापडला.
४. बुरखा घातलेल्या त्या हिंदु तरुणीला नातेवाईक आणि हिंदु एकता आंदोलनाचे कार्यकर्ते यांनी कह्यात घेऊन तिची सुटका केली.
५. हिंदु तरुणीच्या हातात बांधलेले तावीज, अन्य दोरे, तसेच बुरखा काढून टाकला. तिचे समुपदेशन करून पुन्हा तिची ‘नोटरी’ केली. त्यानंतर हिंदु तरुणीचे शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदु धर्मात घेतले.
६. मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मला फसवून भावनिक आणि मानसिक दबाव निर्माण करून माझे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले होते. या तरुणीला तिचे आई-वडील घरी घेऊन गेले.
या मोहिमेत हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री आशिष साळुंखे, अंकुश जाधव, अनिरुद्ध कुंभार, आकाश जाधव, प्रदीप निकम, विनायक खेत्रे, राहुल बोळाज, आकाश जाधव, श्रीनिवाज नाझरे, संजय जाधव, राजू जाधव, अनुज निकम, मयूर निकम, श्रीधर मिस्त्री आदींसह वरील हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदु तरुणींचे धर्मांतर करणार्या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना रहित होण्यासाठी आंदोलन करू ! – श्री. नितीन शिंदे, माजी आमदारया वेळी बोलतांना हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते (स्टॅम्प व्हेंडर) आणि नोटरी अधिवक्ते यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्पवर (मुद्रांकावर) हिंदु तरुणींचे हिंदु धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतर करायची नोटरी करू नये. सदरची नोटरी अनधिकृत आहे. १०० रुपयांच्या स्टॅम्पवर धर्मांतर झाले, तर भारताला इस्लामी राष्ट्र घोषित व्हायला वेळ लागणार नाही. मुद्रांक विक्रेत्यांनी हिंदु तरुणींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांचा परवाना रहित करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल.’’ |
संपादकीय भूमिका
|