पारोळा (जिल्हा जळगाव) – वाहन चालवण्यासाठी वयाची किमान १८ वर्षे पूर्ण असावीत, असा नियम आहे; मात्र शहरात बहुसंख्य अल्पवयीन मुले-मुली दुचाकी चालवतांना दिसतात. प्रत्यक्षात त्यांच्याकडे वाहन परवानाही नाही. इयत्ता आठवी, नववीतील विद्यार्थी शाळेतही दुचाकी घेऊन येतात. खासगी शिकवणीवर्गाच्या आवारातही या विद्यार्थ्यांच्या दुचाकी लावलेल्या असतात.
संपादकीय भूमिकाअशातच अपघात घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? पालक आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांनी याकडे लक्ष द्यायला हवे ! |