जालना – मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या ९ व्या दिवशी ‘आमरण उपोषण’ स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता. मला वारंवार विनंती केली. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला, त्यांना सोडणार नाही, अशी चेतावणीही त्यांनी दिली. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज एकच आहेत. नेत्यांची सभा आणि प्रचार यांना जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.