माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार ‘पर्यावरण सेवा योजना’ !

मुंबई – राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये ‘पर्यावरण सेवा योजना’ राबवण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी १ सहस्र अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ५ वर्षांत ही योजना राबवण्यात येणार आहे. शाळेच्या नियमितच्या वेळेसह आठवड्यातील ३ घंटे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. बालवयात मनावर निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे हा या उपक्रऱ्माचा मुख्य उद्देश आहे.