मुंबई – येथील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पोलीस ठाण्यांतील पोलिसांना १२ घंटे कामावर उपस्थित रहावे लागते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचे ८ घंटे होण्याविषयी मोठी चर्चा झाली; परंतु कोरोना महामारीच्या काळात त्यांना १२ घंटे कामावर यावे लागत होते. आता नव्याने पोलीस भरतीही होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कामाचे परत एकदा ८ घंटे करण्याविषयी चर्चा चालू आहे. मुंबईत टप्प्याटप्प्याने सर्व पोलीस ठाण्यांत याची कार्यवाही करण्यात येईल. १२ घंटे कर्तव्यावर असल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबाला नीट वेळ देता येत नाही. मुंबईची लोकसंख्या, महत्त्वाच्या घटना, कायमचा बंदोबस्त यांमुळे पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण पडतो. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते.