बेळगाव – कर्नाटक विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ९ डिसेंबरपासून बेळगाव येथे होत आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा घेण्यात येणार. या मेळाव्यास प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. असे असले तरी मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे. हा मेळावा जिथे घेण्यात येणार आहे, त्या टिळकवाडी येथील ‘वॅक्सिन डेपो मैदाना’वर जाऊन समितीच्या पदाधिकार्यांनी पहाणी केली.