बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ पनवेल येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने स्‍वाक्षरी मोहीम !

पनवेल – बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार आणि ‘इस्‍कॉन’चे प्रमुख चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांना देशद्रोहाच्‍या आरोपाखाली अन्‍याय्‍य अटक करण्‍यात आली आहे. याच्‍या निषेधार्थ येथे माजी महापौर सौ. चारूशिला घरत, भाजपचे अधिवक्‍ता मनोज भुजबळ यांच्‍या नेतृत्‍वात सकल हिंदु समाजाच्‍या वतीने स्‍वाक्षरी मोहीम घेण्‍यात आली. मंदिरात येणार्‍या भाविकांना बांगलादेशात अल्‍पसंख्‍यांक हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांचे  अत्‍याचाराची माहिती देऊन स्‍वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्‍यास सांगण्‍यात येत होते.

या वेळी सौ. चारूशिला घरत म्‍हणाल्‍या, ‘‘बांगलादेशातील अत्‍याचारांचा आम्‍ही कठोर शब्‍दांत निषेध करतो. १० डिसेंबर या दिवशी दुपारी ४.३० वाजता पनवेल रेल्‍वेस्‍थानक ते पनवेल बसस्‍थानक अशी मानवी साखळी आम्‍ही करणार आहोत. यात सहभागी व्‍हा !’’

भाजपचे अधिवक्‍ता मनोज भुजबळ म्‍हणाले, ‘‘भारत-पाकिस्‍तान फाळणीच्‍या वेळी हिंदूंवर जसे अत्‍याचार झाले, तसेच अत्‍याचार बांगलादेशातील हिंदूंवर होत आहेत. स्‍वाक्षरी मोहिमेच्‍या माध्‍यमातून त्‍या हिंदूंच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहून १० डिसेंबर या दिवशी मानवी साखळीत सहभागी व्‍हावे.’’