अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पुराव्याअभावी युवकाची निर्दाेष सुटका

पणजी, ८ डिसेंबर (वार्ता.) – मुरगाव तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीवर वर्ष २०२२ मध्ये लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादण्यात आले होते. या प्रकरणी पणजी येथील जलद गती आणि पॉक्सो न्यायालयाने ३० वर्षीय संशयित युवकाची निर्दाेष सुटका केली. हा आदेश न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी दिला.

१ मे २०२२ या दिवशी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयित युवकाच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेतले होते. या प्रकरणी न्यायालयात पीडित मुलीच्या वयासंदर्भात पुरावे सुपुर्द करण्यात आले नाहीत. त्याचप्रमाणे पोलीस संशयित युवक आणि बाळ यांच्या ‘डी.एन्.ए.’ चाचणीच्या संदर्भात वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर करण्यास अपयशी ठरले. याची नोंद घेऊन न्यायालयाने युवकाची निर्दाेष सुटका केली.

संपादकीय भूमिका

पोलिसांचे अन्वेषण कमकुवत होते कि कायदे कमकुवत आहेत ?