भांडुप येथे ३ विद्यार्थिनींची छेड काढणार्या कर्मचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
शालेय विद्यार्थिनींसमवेत तेथील कर्मचार्यांकडून होणारे अश्लील वर्तनाचे प्रकार शालेय प्रशासनासाठी चिंताजनक ! अशा वासनांध कर्मचार्यांना कामावरून काढूनच टाकायला हवे !
शालेय विद्यार्थिनींसमवेत तेथील कर्मचार्यांकडून होणारे अश्लील वर्तनाचे प्रकार शालेय प्रशासनासाठी चिंताजनक ! अशा वासनांध कर्मचार्यांना कामावरून काढूनच टाकायला हवे !
बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची वारंवारता पहाता जोपर्यंत असे करणार्यांना तात्काळ कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणे कठीण आहे !
पनवेल येथील सनातनच्या साधिका सौ. पूर्वा कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शाळेत, म्हणजे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालयात सनातन संस्थेने प्रकाशित केलेली बालसंस्कारविषयीची ग्रंथमालिका ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत भेट दिली.
२९ नोव्हेंबरला सायंकाळी आयोजित केलेल्या विश्वविद्यालयाच्या ११व्या दीक्षांत समारंभात प.पू. स्वामीजींना ‘विद्यावाचस्पति’ (डी.लिट्) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. वैदिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी प.पू. स्वामीजींना सन्मानित करण्यात आले.
असे वासनांध प्राचार्य आणि संस्था विद्यार्थ्यांना काय शिकवणार ? असा प्रश्न निर्माण होतो ! शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडणार्या अशा घटना पहाता समाजाची नीतीमत्ता आणि नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे लक्षात येते !
खंडवा, मध्यप्रदेश येथे काढण्यात आलेल्या मशाल मोर्चामुळे आग लागल्याने ५० जण घायाळ झाले. आग लागल्याने येथे चेंगराचेंगरीही झाली.
सोहळ्यानिमित्त पोलीस बंदोबस्त असतांना अशा घटना घडतात, म्हणजेच पोलिसांचा वचक अल्प झाला आहे, हेच लक्षात येते !
सकाळी ८ वाजता दिवंगत डॉ. पाठक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून ९ वाजता शिबिर घेतले जाईल. दिवंगत डॉ. पाठक नामांकित वैद्यकीय तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते.
बांगलादेशाच्या बँकेच्या वित्तीय गुप्तचर विभागाने देशातील बँका आणि वित्तीय संस्थ यांना निर्देश पाठवले असून चिन्मय प्रभु अन् इस्कॉनचे १६ सदस्य यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
रुक्मिणीनगर येथील ‘ब्रह्माकुमारीज’ सेवाकेंद्रात २५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात समाजसेवेसाठी विविध क्षेत्रांतील संस्था आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘सनातन संस्थे’चाही विशेष सन्मान करण्यात आला.