|
नवी देहली – तिरुपती मंदिरातील लाडूंच्या संदर्भातील घटना वादापेक्षा मोठी आहे. मंगल पांडे यांना गायीची चरबी लावलेली बंदुकीची काडतुस तोंडाद्वारे उघडायला सांगितली आणि मग त्यावरून देशात क्रांती झाली होती, अशी प्रतिक्रिया ज्योषित पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
Mangal Pandey’s legacy inspires us to fight
Tirupathi Laddu scandal: A betrayal of Hindu trust
As long as there’s a gomatha, we can’t become impure.- Shankaracharya Avimukteswarananda Saraswati#Free_TTD_From_Govt
Sanatan Board for Templespic.twitter.com/bKwBhPZ4ie— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 26, 2024
शंकराचार्य पुढे म्हणाले की, आज कोट्यवधी भारतियांच्या तोंडी गोमासांची चरबी घातली गेली. ही काही लहान घटना नाही. हा हिंदु समाजासमवेत मोठा विश्वासघात आहे. ४-५ दिवस उलटून गेले आहेत. या घटनेच्या अन्वेषणाला विलंब होईल; पण ही घटना विसरता येणार नाही. हा एक मोठा आणि संघटित गुन्हा आहे. याला जो कुणी उत्तरदायी असेल, त्याला समोर आणून कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत गोमाता आहे, तोपर्यंत आपण अपवित्र होऊ शकत नाही.