महिलेचा मारेकरी मुसलमान असल्याचे उघड !

  • बेंगळुरूतील विवाहित हिंदु महिलेच्या निर्घृण हत्येचे प्रकरण

  • पोलीस आणि गृहमंत्री यांच्याकडून मारेकर्‍याचे नाव सांगण्यास टाळाटाळ !

बेंगळुरूतील हत्या झालेली विवाहित हिंदु महिला महालक्ष्मी (उजवीकडे)

बेंगळुरू (कर्नाटक) – महालक्ष्मी नावाच्या २९ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे २० तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याची भयावह घटना नुकतीच समोर आली. आता या महिलेच्या पतीने या संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. दोघे गेल्या ९ महिन्यांपासून वेगळे रहात आहेत. पती हेमंत दास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शहरातील व्यालिकवल परिसरात महालक्ष्मी एकटीच रहात होती. अश्रफ नावाच्या महालक्ष्मीच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचा मला संशयच नाही, तर निश्‍चिती आहे. महालक्ष्मीचे अश्रफशी संबंध होते.
दास यांनी पुढे सांगितले की, अश्रफ हा उत्तराखंड राज्यातील आहे. बेंगळुरू पोलीस ठाण्यात मी काही महिन्यांपूर्वी त्याच्याविरुद्ध तक्रारही प्रविष्ट (दाखल) केली होती. यानंतर त्याला बेंगळुरूत येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता; पण त्या नंतर तो कुठे गेला ?, हे मला ठाऊक नाही.

बेंगळुरू पोलीस आणि गृहमंत्री यांची भूमिका संशयास्पद !

‘सनातन प्रभात’ने बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांना या प्रकरणी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर उत्तर देण्याचे टाळले. त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही मुख्य संशयिताची ओळख पटवली असून त्याचा शोध चालू केला आहे; परंतु त्याची ओळख उघड करू इच्छित नाही. आरोपी कर्नाटक राज्याच्या बाहेरील आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी सांगितले की, पोलीस या गुन्ह्याचा कसून तपास करत आहेत. आरोपीला लवकरच पकडून न्यायालयात उपस्थित केले जाईल.

काय आहे प्रकरण ?

हेमंत दास आणि महालक्ष्मी हे विवाहानंतर ६ वर्षे एकत्र होते. त्यांना एक मुलगीही आहे. दोघांचे पटत नसल्याने ९ महिन्यांपूर्वी दोघे वेगवेगळे राहू लागले. महालक्ष्मी ही अश्रफ नावाच्या उत्तराखंडमधून आलेल्या मुसलमानाच्या प्रेमात पडली. हेमंत दास हे भ्रमणभाष विक्री करणार्‍या दुकानात काम करतात, तर महालक्ष्मी एका कपड्याच्या दुकानात काम करत होती.
२० सप्टेंबरला महालक्ष्मीचा मृतदेह तिच्या रहात्या घरी अतिशय छिन्न-विछिन्न अवस्थेत फ्रिजमध्ये आढळून आला होता. मृतदेहाचे २० तुकडे करण्यात आले होते. घराबाहेर दुर्गंधी पसरल्यानंतर शेजार्‍यांनी महालक्ष्मीच्या आईला आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघड झाले.

संपादकीय भूमिका

  • एरव्ही एखाद्या गुन्ह्यात एखाद्या हिंदुत्वनिष्ठाचा सहभाग असल्याचा संशय जरी आला, तरी पोलीस आणि काँग्रेस सरकार त्याच्यावर चिखलफेक करून त्याला देशोधडीला लावतात. आता आरोपी मुसलमान असल्याने त्याचे नावही घ्यायला काँग्रेस सरकार आणि तिचे पोलीस यांना लाज वाटते का ?
  • आता या घटनेनंतर तरी केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करून सर्व राज्य सरकारांना त्याची कार्यवाही करण्यासाठी बाध्य केले पाहिजे !