बांगलादेशातील हिंदूंवर झालेले अत्याचार आणि मंदिर तोडफोडीच्या निषेधार्थ मिरज येथे आंदोलन !

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट या दिवशी येथील महाराणा प्रताप चौक येथे दुपारी १२ वाजता हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘निषेध आंदोलन’…

शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ !

शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आर्.टी.ई.) खासगी शाळांमध्‍ये २५ टक्‍के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे. त्‍यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्‍यांना ८ ऑगस्‍टपर्यंत प्रवेश घेण्‍याची संधी आहे.

‘सज्‍जनगड रन २०२४’चे आयोजन !

श्रीक्षेत्र सज्‍जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ आणि दिवेकर रुग्‍णालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘सज्‍जनगड रन २०२४’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या उपक्रमात सातारावासियांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभागी व्‍हावे, असे आवाहन आयोजकांच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे आमदाराने धमकावल्‍यामुळे आचार्‍याने घेतला गळफास !

जिल्‍ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि त्‍यांच्‍या भावाने धमकी दिली आहे, असे चिठ्ठीवर लिहून मिलिंदनगर भागात एका आचार्‍याने गळफास घेतला. जगदीश सुरभय्‍ये असे गळफास घेतलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २७ उपाहारगृहे बंद करण्याचा आदेश

२७ उपाहारगृहे आवश्यक अनुज्ञप्ती न घेता कार्यरत आहेत, हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या लक्षात का येत नाही ? कुणीतरी न्यायालयात गेल्यावर कारवाई करणारे प्रशासन काय कामाचे ?

गोव्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना होणार

९ ऑगस्टला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. या बैठकीत वायनाड येथील दुर्घटनेवरून राज्याचे पुनरावलोकन करण्यात आले.

बांगलादेशात अंतरिम सरकार स्‍थापन : महंमद युनूस झाले प्रमुख !

नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस हे बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले आहेत. त्‍यांना ८ ऑगस्‍टच्‍या रात्री राष्‍ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी मंत्रीपदाची शपथ दिली.

Vijay Surya Mandir : विदिशा (मध्‍यप्रदेश) येथील प्राचीन विजय सूर्य मंदिराला पुरातत्‍व विभागाने मशीद ठरवल्‍याने वाद

नागपंचमीच्‍या दिवशी पूजा करण्‍याची मागितलेली अनुमती जिल्‍हाधिकार्‍यांनी पुरातत्‍व विभागाच्‍या दाव्‍यानंतर नाकारली !

Human Rights Watch : (म्‍हणे) ‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणामागे राजकीय कारण  !’ – ‘ह्यूमन राइट्‍स वॉच’च्‍या आशियातील उपसंचालिका मीनाक्षी गांगुली

मीनाक्षी गांगुली या हिंदु असण्‍यासोबत बंगालीही आहेत; मात्र त्‍या बंगाली हिंदूंच्‍याच विरोधात बोलून जिहाद्यांना पाठीशी घालून हिंदुद्रोह करत आहेत ! अशांना कधीतरी हिंदु म्‍हणता येईल का ?

Anti Conversion Law Arrest : उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत १ सहस्र ६८२ जणांना अटक

लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करून संबंधितांवर कारवाई करूनही उत्तरप्रदेशात लव्‍ह जिहादच्‍या घटना थांबलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे अशांना जन्‍मठेप नाही, तर फाशीचीच शिक्षा करण्‍याचा पालट कायद्यात केला पाहिजे !