बांगलादेशातील हिंदूंवर झालेले अत्याचार आणि मंदिर तोडफोडीच्या निषेधार्थ मिरज येथे आंदोलन !

निषेध आंदोलनात बांगलादेशाचा ध्वज जाळतांना हिंदुत्वनिष्ठ

मिरज (जिल्हा सांगली), ९ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट या दिवशी येथील महाराणा प्रताप चौक येथे दुपारी १२ वाजता हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले. या वेळी ‘हिंदूंवर अत्याचार करणार्‍या बांगलादेश, पाकिस्तानचा निषेध असो’, ‘बांगलादेश पाकिस्तानचा धिक्कार’, ‘जला दो जला दो बांगलादेश जला दो’, अशा घोषणा हिंदुत्वनिष्ठांनी दिल्या.

या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी घोषणा देत बांगलादेशाचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळला. हिंदुत्वनिष्ठांनी स्वत:च्या भाषणात सांगितले की, मिरज शहरात लपून रहात असलेल्या बांगलादेशातील नागरिकांना शोधून काढण्याचे काम हिंदुत्वनिष्ठांनी चालू केलेले आहे. त्यांना शोधून त्यांच्या देशात परत पाठवले जाईल.

या आंदोलनापूर्वी कोणताही अनुचित प्रकार न करण्याविषयी पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना नोटीस पाठवली होती. शिवसेनेचे सर्वश्री विजय शिंदे, चंद्रकांत मैंगुरे, गजानन मोरे, भाजपचे अनिल रसाळ, ओंकार शुक्ल, मोहन वाटवे, शशिकांत वाघमोडे, हिंदु एकता आंदोलनाचे सोमनाथ गोटखिंडे, प्रथमेश कोरे, बजरंग दलाचे आकाश जाधव यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.