सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ भक्‍तीमय वातावरणात साजरा !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

वाळवे-बद्रुक (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्‍णा रक्‍ताडे महाराज यांचा गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने सन्‍मान !

राधानगरी तालुक्‍यातील वाळवे-बद्रुक येथील संत पू. (ह.भ.प.) धोंडिराम कृष्‍णा रक्‍ताडे महाराज (वय ७३ वर्षे) यांचा सनातन संस्‍थेच्‍या वतीने गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने २१ जुलैला त्‍यांच्‍या निवासस्‍थानी सन्‍मान करण्‍यात आला.

कांदळी (पुणे) येथील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या समाधीस्‍थळी गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्‍थेचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या कांदळी येथील समाधीस्‍थळी २१ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्‍यात आला.

पाकिस्तानने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ‘आतंकवादी’ घोषित केले !

पाकिस्तानचा हास्यास्पद निर्णय ! ज्या देशाला ‘आतंकवाद्याचा कारखाना’ असल्यावरून जगाने ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे, तो देश एका देशाच्या पंतप्रधानाला आतंकवादी घोषित करतो, याहून मोठा विनोद कोणता असेल ?

गौरीकुंड (उत्तराखंड) येथे दरड कोसळून ३ भाविकांचा मृत्यू

केदारनाथ यात्रा मार्गावर गौरीकुंडजवळ २१ जुलैच्या सकाळी दरड कोसळली. या वेळी मोठमोठे दगड खाली पडू लागले. यामुळे ३ भाविकांचा मृत्यू झाला

Sindhu-Saraswati Culture In Text Book  :  नवीन पाठ्यपुस्‍तकात ‘हडप्‍पा’ऐवजी ‘सिंधू-सरस्‍वती संस्‍कृती’चा नामोल्लेख !

केंद्रशासनाने आर्य आक्रमण सिद्धांत हा कशा प्रकारे धादांत खोटा आहे, हे सोदाहरण सांगून सनातन हिंदु धर्म हा या भूमीतूनच सर्वत्र पसरला, हे स्‍पष्‍ट केले पाहिजे !

उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू होणार !

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जुलैपासून आरंभ होत आहे.  १२ ऑगस्टपर्यंत, म्हणजे साधारण ३ आठवडे हे अधिवेशन चालणार आहे.

नोकरीच्या आमिषाला बळी पडल्याने कंबोडियात ६५० भारतीय अडकले !

साधारण ६५० हून अधिक भारतियांना ‘सायबर स्लेव्ह’, म्हणजेच गुलाम बनवून त्यांच्याकरवी सायबर गुन्हे करवून घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

३ वर्षांपासून बेपत्ता असणार्‍या ७ वर्षांच्या हिंदु मुलीच्या शोधासाठी पालकांची कराचीमध्ये निदर्शने

पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मुलींची हीच स्थिती आहे. याविषयी कुणीही आवाज उठवत नाही, हे तेथील हिंदूंचे दुर्दैव !

फ्रँकफर्ट (जर्मनी) येथील पाकिस्‍तानी वाणिज्‍य दूतावासावर अफगाणी नागरिकांचे आक्रमण !

पाकिस्‍तानच्‍या वाणिज्‍य दूतावासावर अफगाणिस्‍तानच्‍या नागरिकांनी आक्रमण केल्‍याची घटना २० जुलैला घडली. या घटनेचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला आहे.