इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – शतकोत्तर महोत्सवी आपटे वाचन मंदिर (शासनमान्य ‘अ’ वर्ग तालुका वाचनालय) ग्रंथालयाच्या वतीने शहरातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सौ. गंगामाई महिलालय संचालित सौ. गंगामाई बालक मंदिर इचलकरंजी मधील शिक्षिका श्रीमती अश्विनी दयानंद स्वामी यांना ‘शिक्षक गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमती अश्विनी स्वामी या संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्या ऑनलाईन सत्संगात उपस्थित असतात, तसेच सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येणार्या अध्यात्मप्रचाराच्या विविध सेवेत त्या सहभागी असतात.
या संदर्भात श्रीमती अश्विनी दयानंद स्वामी म्हणाल्या, ‘‘हा पुरस्कार मला केवळ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मिळाला. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांच्या चरणी अर्पण करते.’’