Masjid In Hindu Village Basoli : हिमाचल प्रदेश – १०० टक्के हिंदु लोकसंख्येच्या बसोली गावात उभारण्यात आली मशीद !

मशीद हटवण्याची संतप्त हिंदूंची मागणी !

गुप्तपणे बांधलेली मशीद

शिमला (हिमाचल प्रदेश) – (Himachal Pradesh)राज्यातील ऊना जिल्ह्यात असलेल्या बसोली या १०० टक्के हिंदु(Hindu) लोकसंख्येच्या गावात गुप्तपणे मशीद(Mosque )बांधण्यात आल्याचे समोर आले आहे. गावात एकही मुसलमान(Muslim) नसतांना मशीद बांधली जात असल्याचे पाहून लोकांना धक्का बसला आणि त्यांनी जिल्हा प्रशासनाला मशीद हटवण्यासाठी निवेदन दिले. राजधानी शिमल्यातील संजौली भागातील, तसेच राज्यातील अन्यही अनेक शहरांतील अवैध मशिदींच्या सूत्रावरून हिंदु आणि मुसलमान आधीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आता या घटनेवरून ऊना जिल्ह्यातही वादाला तोंड फुटले आहे.

बसोली गावातील हिंदू म्हणाले की, येथे नमाजपठण करणारे कुणीच नसतांना ती बांधण्याचे प्रयोजन काय ? ऊनाची लोकसंख्या पालटण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?प्रत्यक्षात ही भूमी वर्ष २०१० मध्ये विकली गेली. त्या वेळी एका मुसलमान व्यक्तीने ही भूमी खरेदी केली. त्यानंतर या भूमीवर बांधकाम चालू झाले. रस्त्यापासून दूर असलेल्या या भूखंडावरील बांधकामाकडे कुणीही लक्ष दिले नाही. आता बांधकाम पूर्ण होऊन तेथे मशीद बांधली गेल्याने मात्र प्रकरण तापले आहे. लोकांनी जिल्हा प्रशासनाला मशीद हटवण्यासाठी ७ दिवसांची निर्वाणीची चेतावणी दिली होती; मात्र आता ही मुदत संपल्यानंतर लोकांचा संताप शिगेला पोचला आहे.

जिल्हा प्रशासनाने मशिदीच्या जागेची पाहणी केली असून त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

आधी मशीद उभारायची, नंतर नमाजपठण करण्यासाठी सभोवताली घरे बांधायची आणि तेथील भूमीवर बेकायदेशीर नियंत्रण मिळवून वक्फ कायद्याच्या आडून त्याला अधिकृत करवून घ्यायचे, असा हा भयावह प्रकार आहे. हिमाचल प्रदेशातील लक्षावधी हिंदू आज या भूमी जिहादचा नायनाट करण्यासाठीच हिंदुत्वनिष्ठ कमल गौतम यांच्या नेतृत्वाखाली लढत आहेत. याचा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी घेतला पाहिजे !