हमासचे आतंकवादी मशिदीतून करत होते आतंकवादी कारवाया !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने(Israel) गाझा(Gaza) पट्टीतील मशिदीवर(mosque) हवाई आक्रमण केले. या आक्रमणात अनुमाने २४ जण ठार झाले असून ९३ जण घायाळ झाले आहेत. गाझा पट्टीतील दीर अल्-बलाहमध्ये (Deir al-Balah) अल्-अक्सा रुग्णालयाजवळील मशिदीवर हे आक्रमण झाले. या आक्रमणाविषयी इस्रायलने निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, दीर अल्-बलाह भागात ‘शुहादा अल्-अक्सा’ मशिदीत असलेल्या हमासच्या आतंकवाद्यांवर(terrorists) बिनचूक आक्रमण करण्यात आले. हे आतंकवादी या मशिदीतून कारवाया करत होते.
गाझातील धार्मिक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या आक्रमणात गाझातील १ सहस्र २४५ मशिदींपैकी ८१४ मशिदी नष्ट झाल्या आहेत, तर १४८ मशिदींची मोठी हानी झाली आहे. यासह ३ चर्चही नष्ट झाली आहेत. यासह ६० पैकी १९ स्मशानभूमींनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाहमासचेच नाहीत, तर जगभरातील आतंकवादी मशिदी, तसेच मदरसे येथून आतंकवादी कारवाया करतात. धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदींतूनच दगडफेक करतात. असे असले, तरी जगभरातील सर्वसामान्य मुसलमानांकडून याला कोणताही विरोध होत नाही, हे लक्षात घ्या ! |
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Japan Earthquake : जपानमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीची चेतावणी
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !