३ वर्षांपासून बेपत्ता असणार्‍या ७ वर्षांच्या हिंदु मुलीच्या शोधासाठी पालकांची कराचीमध्ये निदर्शने

हिंदु मुलीच्या पालकांनी तिला शोधून परत आणण्याच्या मागणीसाठी कराचीमध्ये केली निदर्शने

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून बेपत्ता झालेल्या हिंदु मुलीच्या पालकांनी तिला शोधून परत आणण्याच्या मागणीसाठी कराचीमध्ये निदर्शने केली. ७ वर्षांची प्रिया कुमारी १९ ऑगस्ट २०२१ या दिवशी पाकिस्तानमधील दक्षिण सिंध प्रांतातील सुक्कूरजवळील संगार येथे तिच्या घराजवळ मोहरम आशुरा मिरवणुकीत सरबत वाटत असतांना बेपत्ता झाली. तिचा शोध घेऊन कंटाळून तिचे वडील राज कुमार पाल आणि आई वीणा कुमारी यांनी कराचीच्या क्लिफ्टन भागातील प्रसिद्ध ३ तलवार या ठिकाणी निदर्शने केली. त्यांचा उद्देश लोकांना आठवण करून देण्याचा होता की, त्यांची मुलगी अद्याप सापडलेली नाही.

वडील राज कुमार पाल म्हणाले की, आम्हाला पुन्हा आश्‍वासन देण्यात आले  आहे की, ते आमच्या मुलीचा शोध घेत असून लवकरच तिचा शोध घेण्यात येईल. या आश्‍वासनानंतर निदर्शने मागे घेण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मुलींची हीच स्थिती आहे. याविषयी कुणीही आवाज उठवत नाही, हे तेथील हिंदूंचे दुर्दैव !
  • पाकिस्तानमध्ये कुणीही पुरोगामी, निधर्मीवादी किंवा सर्वधर्मसमभाव मानणारा नसल्याने अल्पसंख्यांक असणार्‍या हिंदूंची ही स्थिती आहे. याउलट पुरोगामी, निधर्मीवादी किंवा सर्वधर्मसमभाव मानणार्‍यांमुळे भारतात अल्पसंख्यांक मुसलमानांची स्थिती हिंदूंपेक्षा चांगली आहे !