शिमला न्यायालयाचा मशीद समितीला आदेश
शिमला (हिमाचल प्रदेश) – येथील ५ मजली संजौली मशिदीचे बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले ३ मजले येत्या २ मासांत पाडा, असा आदेश शिमला न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ डिसेंबरला होणार आहे. ‘मशीद समिती आणि वक्फ बोर्ड यांनी मशिदीचे वरचे ३ मजले स्वखर्चाने पाडून घ्यावेत’, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. ‘इमारतीच्या उर्वरित बेकायदेशीर भागांविषयी नंतर निर्णय घेतला जाईल’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
संजौली मशिदीचे बांधकाम वर्ष २००९ मध्ये चालू झाले होते. वर्ष २०१० पर्यंत मशिदीच्या बांधकामावरून वाद चालू झाला. बेकायदेशीर बांधकामे रोखण्यासाठी महापालिकेकडून एकूण ३८ नोटिसा मशिदीला बजावण्यात आल्या होत्या. (कारवाई करण्याऐवजी ‘आम्ही काहीतरी करत आहोत’, हेच दाखवण्याचा प्रयत्न महापालिकेने केला, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकार आणि प्रशासन ३ मजले बेकायदेशीरपणे बांधले जात असतांना काय करत होते ? न्यायालयाने उत्तरदायी अधिकार्यांना दंड केला पाहिजे आणि बांधणार्यांना शिक्षा केली पाहिजे, ही राज्यातील लक्षावधी हिंदूंची मागणी आहे ! |