नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जुलैपासून आरंभ होत आहे. १२ ऑगस्टपर्यंत, म्हणजे साधारण ३ आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् २३ जुलैला अर्थसंकल्प मांडतील.
अधिवेशनात विरोधक रेल्वे सुरक्षेसह विविध सूत्रांवर आक्रमक होणार असल्याची चर्चा आहे. ९० वर्षे जुना विमान कायदा पालटण्यासाठीच्या विधेयकासमवेत ६ विधेयके अधिवेशनात सादर केली जातील. यासह जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पाला स्वीकृती मिळण्याची शक्यता आहे.