कांदळी (पुणे) येथील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या समाधीस्‍थळी गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

श्री रामचंद्रदेव ट्रस्‍ट एवं प.पू. भक्‍तराज महाराज समाधी ट्रस्‍ट यांच्‍या वतीने उत्‍सवाचे आयोजन !

प.पू. भक्‍तराज महाराज

कांदळी (जिल्‍हा पुणे), २१ जुलै (वार्ता.)-  सनातन संस्‍थेचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या कांदळी येथील समाधीस्‍थळी २१ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्‍यात आला. ‘श्री रामचंद्रदेव ट्रस्‍ट एवं प.पू. भक्‍तराज महाराज समाधी ट्रस्‍ट’ यांच्‍या वतीने उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी मोठ्या संख्‍येने भक्‍त उपस्‍थित होते.

गुरुपौर्णिमेच्‍या आदल्‍या दिवशी विविध कार्यक्रम

२० जुलै २०२४ या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या समाधीची नित्‍य नैमित्तिक पूजा करण्‍यात आली. सायंकाळी ५ ते रात्री ७ या वेळेत स्नेहलता मधुकर कुलकर्णी आणि परिवार यांनी भगवान श्रीकृष्‍ण आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या लीलांमधील साधर्म्‍य असणारे बाबांचे (प.पू. भक्‍तराज महाराज यांचे) चरित्र वर्णन आणि बाबांच्‍या स्‍वरचित भजनांचा कार्यक्रम सादर केला. रात्री ७.३० ते ८ या वेळेत प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या समाधीची नित्‍य नैमित्तिक आरती करून नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. रात्री ९.३० ते ११ या वेळी कीर्तनकार सौ. मंजुषा भाभे यांचे कीर्तन झाले. रात्री ११ वाजता भक्‍तांद्वारेे प.पू. भक्‍तराज महाराज लिखीत भजनाचा कार्यक्रम सादर करण्‍यात आला.

कांदळी येथील समाधीस्‍थळाची आकर्षक फुलांनी सजावट करतांना भाविक

गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या समाधीस अभिषेक

रविवार, २१ जुलै २०२४ या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या समाधीस अभिषेक आणि श्री सत्‍यनारायण पूजा करण्‍यात आली. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

२० आणि २१ जुलै २०२४ या दिवशी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत निसर्गोपचार (नॅचरोपॅथी) विशेषज्ञ डॉ. सोनल महाजन आणि डॉ. अनंत महाजन यांनी निसर्गोपचार शिबिर घेतले.