AIMPL President : (म्‍हणे) ‘संपूर्ण देशातील शांतता आणि सुव्‍यवस्‍था बिघडू शकते !’ – खालिद सैफुल्लाह रहमानी

  • ऑल इंडिया मुस्‍लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्‍यक्ष खालिद सैफुल्लाह रहमानी यांचे समाजघातक वक्‍तव्‍य

  • यति नरसिंहानंद यांनी पैगंबर यांचा कथित अवमान केल्‍याचे प्रकरण

ऑल इंडिया मुस्‍लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्‍यक्ष खालिद सैफुल्लाह रहमानी व यति नरसिंहानंद

नवी देहली – यति नरसिंहानंद यांच्‍या विधानावर ऑल इंडिया मुस्‍लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्‍यक्ष खालिद सैफुल्लाह रहमानी म्‍हणाले की, इस्‍लाम धर्माचे प्रेषित महंमद साहेब यांचा नरसिंहानंद यांनी अवमान करून दाखवलेला उद्धटपणा असह्य आहे. प्रतिक्रिया म्‍हणून तरुण हिंसक झाले, तर संपूर्ण देशाची शांतता आणि सुव्‍यवस्‍था बिघडू शकते. इस्‍लामची संकल्‍पना स्‍पष्‍ट आहे की, सर्व धर्मांमध्‍ये पवित्र व्‍यक्‍तीमत्त्वे आहेत. आपण त्‍यांच्‍यावर विश्‍वास ठेवतो किंवा नाही, त्‍यांचा आदर करणे आपल्‍यासाठी महत्त्वाचे आहे. इस्‍लाम एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवतो. मुसलमान मूर्तीपूजेवर विश्‍वास ठेवत नाहीत; परंतु कुराण इतर समुदायांद्वारे पूजल्‍या जाणार्‍या देवतांना वाईट बोलण्‍यास मनाई करते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमणे होत असतांना, मंदिरांची मुसलमानांकडून तोडफोड केली जात असतांना, बांगलादेशात हिंदूंवर आक्रमणे केली जात असतांना भारतातील हिंदूंनी कधी शांतता आणि सुव्‍यवस्‍था बिघडेल, अशी कृती केली नाही; मात्र धर्मांध कथित विधानावरून अशी धमकी देतात, हे लक्षात घ्‍या !