भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांचे पोलिसांना आवाहन
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून ४ ऑक्टोबरच्या रात्री सहस्रो मुसलमानांनी डासना मंदिराबाहेर गर्दी केली होती. या प्रकरणी लोणी येथील भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर ५ ऑक्टोबर या दिवशी मंदिरात पोचले. ‘मंदिरांवर ज्यांनी आक्रमण केले, त्यांना ठार केले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले.
Those who attacked the Dasna temple should be killed! – BJP MLA Nand Kishore Gurjar
BJP MLA Nand Kishore Gurjar’s appeal to the police@nkgurjar4bjp #hindulifematters #attacks on #Hindu pic.twitter.com/yUFYNFzTvK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 6, 2024
आमदार गुर्जर पुढे म्हणाले की, या मंदिराला सहस्रो वर्षांचा इतिहास आहे. येथे भगवान परशुरामांनी पूजा केली होती. महाभारत काळात पांडवांनी या मंदिरात येऊन पूजा केली होती. बांगलादेशासह इतर ठिकाणी ज्या प्रकारे हिंदूंवर आक्रमणे झाली आहेत, त्याविषयीच्या संतापाच्या भरात महंत यांनी आर्क्षपार्ह विधान केले असेल, तर त्यांच्याविरुद्ध तक्रार करा, पोलीस कारवाई करतील. देश हा कायदा आणि राज्यघटना यांवर चालतो. ४ ऑक्टोबरच्या रात्री केवळ मंदिरावरच नव्हे, तर सनातन धर्मावरही आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. असे करणार्या लोकांचा पोलिसांनी सामना करावा. आक्रमण करणारे बाहेरून आले होते. त्यामुळे मंदिरात पूजा करण्यासाठी येणार्या हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी हिंदु संघटना जो काही निर्णय घेईल, आम्ही त्याच्यासमवेत आहोत.