पाकचा झेंडाही काढला !
फ्रँकफर्ट (जर्मनी) – येथील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी आक्रमण केल्याची घटना २० जुलैला घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. येथे अफगाणी नागरिकांनी दूतावासात घुसून तोडफोड करण्यासह येथील पाकिस्तानचा झेंडा काढला. या वेळी त्यांची येथील सुरक्षारक्षकांशी चकमकही झाली. या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पाकिस्तानने अफगाण निर्सासितांना पुन्हा अफगाणिस्तानमध्ये पाठवल्यावरून हे आक्रमण झाल्याचे म्हटले जात आहे.
या प्रकरणी जर्मन पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे. आक्रमणाच्या घटनेनंतर पाकिस्तानने कराचीतील जर्मन वाणिज्य दूतावासाची सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास तात्पुरते बंद करण्यात आले आहे.