पाकिस्तानने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ‘आतंकवादी’ घोषित केले !

इस्रायली आस्थापनांवर बंदी घालणार !

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकारने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ‘आतंकवादी’ घोषित केले आहे. ‘तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ (टी.एल्.पी.) हा राजकीय पक्ष काही काळापासून इस्लामाबादमध्ये निदर्शने करत आहे. नेतन्याहू यांना आतंकवादी घोषित करण्याची टी.एल्.पी.ची मागणी होती. अशा परिस्थितीत सरकारने नेतन्याहू यांना आतंकवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्ला म्हणाले की, नेतन्याहू आतंकवाद आणि युद्धातील गुन्हे, यांसाठी दोषी आहेत. नेतन्याहू यांच्यावर खटला चालवावा, अशी आमची मागणी आहे. गाझामधील आक्रमणांसाठी इस्रायलचे आम्ही तीव्र निषेध करतो. सर्व इस्रायली उत्पादने आणि आस्थापने यांच्यावरही बहिष्कार घातला जाईल. कोणत्या उत्पादनांचा इस्रायलशी संबंध आहे ?, यावर संशोधन करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करील. यानंतर या उत्पादनांवर बंदी घातली जाईल.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीही नुकतेच ‘इस्रायलच्या पंतप्रधानांवर कारवाई करावी’, असे म्हटले होते.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानचा हास्यास्पद निर्णय ! ज्या देशाला ‘आतंकवाद्याचा कारखाना’ असल्यावरून जगाने ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे, तो देश एका देशाच्या पंतप्रधानाला आतंकवादी घोषित करतो, याहून मोठा विनोद कोणता असेल ?