केदारनाथ यात्रा थोड्या वेळासाठी थांबली !
देहराडून (उत्तराखंड) – केदारनाथ यात्रा मार्गावर गौरीकुंडजवळ २१ जुलैच्या सकाळी दरड कोसळली. या वेळी मोठमोठे दगड खाली पडू लागले. यामुळे ३ भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. उत्तराखंड राज्याची आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी घटनास्थळी पोचली असून घायाळांना साहाय्य आणि दरड हटवण्याच्या कामाला आरंभ करण्यात आला. यामुळे या मार्गावरील केदारनाथ यात्रा काही वेळ थांबवावी लागली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मृत्युमूखी पडलेल्यांविषयी दुःख व्यक्त केले असून साहाय्य कार्यावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.