पुणे शहरात पुन्हा रक्ताचा तुटवडा !

झिका, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आता शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने ‘प्लेटलेट्स’ची मागणीही वाढली आहे.

निरपराध हिंदूंवरील अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घ्या ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमण वेळेत न काढणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी आणि शिवप्रेमी अन् निरपराध हिंदूंवरील अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घ्या, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयात देण्यात आले.

गोरंबे (कोल्हापूर) येथील मठाधिपती प.पू. अमृतानंद महाराज अनंतात विलीन !

कागल तालुक्यातील ‘विश्वात्मक गुरुदेव जंगली महाराज आश्रम’, गोरंबे येथील मठाधिपती प.पू. अमृतानंद महाराज यांना १३ जुलैला देवाज्ञा झाली. त्यांचे पार्थिव आश्रम परिसरातच दहन करण्यात आले.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आणि कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे करण्यात आला ‘चामुंडा होम’ !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आणि कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे ‘चामुंडा होम’ करण्यात आला. रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र येथील ….

गडचिरोली आणि चंद्रपूर येथे धुवांधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

नगरपरिषद परिसरात, तसेच शहरात पाणी साचले होते. नागरिकांनी पाण्यातून मार्ग काढला. नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याची चर्चा नागरिकांत होती.

राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आपत्ती विभागाला सूचना !

या पार्श्वभूमीवर एस्.डी.आर्.एफ्., जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी साहाय्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

शिल्लेगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील पोलिसांकडून वॉरंट प्रकरणी २७ जण अटकेत !

पहाटे वाँरटमध्ये एकत्रित अटक मोहीम राबवून विविध ठिकाणांहून या सर्वांना अटक केली आहे. दुपारी सर्वांना गंगापूर न्यायालयासमोर उपस्थित केले होते.

बांगलादेशी नागरिकांच्या सुटकेसाठी बनावट जामीन दिल्याच्या प्रकरणी पुणे येथे अधिवक्त्यासह अन्य एकावर गुन्हा नोंद !

बनावट जामीन देणार्‍या अधिवक्त्यालाही बांगलादेशी नागरिकांसमवेत भारतातून हाकलायला हवे !

पेट्रोल आणि सी.एन्.जी. यांवर धावणार्‍या ‘फ्रीडम १२५ सी.एन्.जी.’ मोटारसायकलला मोठी मागणी !

ही बाईक ३३० कि.मी. (सी.एन.जी + पेट्रोल) पर्यंत धावेल. पेट्रोल आणि सी.एन्.जी.वर धावणार्‍या या मोटारसायकलला ग्राहकांची मोठी मागणी आहे.

हिंदूंना आतंकवादी म्हटले जाते, आज जागे झालो नाही, तर नंतर संधीही मिळणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे महाअधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.