दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : शरद पवार गटाच्या आव्हानाला उत्तर द्या !; दादर येथे दूध चोरणार्‍याला पकडले !

राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याविरोधात शरद पवार गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील ४५ रस्ते विकसित करण्यासाठी फक्त १० कोटी रुपयांचे प्रावधान !

वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी असंवेदनशील असणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

राष्ट्रवादीशी युती हे निवडणुकीतील भाजपच्या अपयशाच्या हिमनगाचे टोक ! – साप्ताहिक विवेक

‘कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश आहे, हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले, तरी तेवढेच कारण नसून ते केवळ हिमनगाचे टोक आहे’, अशा शब्दांत ‘विवेक’ साप्ताहिकामधून भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी छळ केल्याचा प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचा आरोप !

वाशिम पोलिसांनी ती तक्रार सध्या चौकशीसाठी ठेवल्याची माहिती आहे. ‘पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी मला त्रास दिला’, असा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे.

छत्रपती शिवरायांची वाघनखे सातार्‍यात पोचली !

शासनाने ही ऐतिहासिक वाघनखे कायमस्वरूपी भारतात रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

केरळ येथील साधिका पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल (वय ८२ वर्षे) यांच्या निधनानंतर सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !

कैमलआजींची आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे ‘त्यांनी काळाचा पडदा ओलांडून भविष्य पाहिले असून ‘त्यांना त्यांच्या मृत्यूची पूर्वसूचना मिळाली होती’, असे मला जाणवले.

त्यागी वृत्ती असणार्‍या कोची, केरळ येथील कै. (श्रीमती) सौदामिनी कैमल (वय ८२ वर्षे) संतपदी विराजमान !

गेल्या १ वर्षापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्या शेवटपर्यंत अखंड नामजप करत होत्या. पू. कैमलआजी यांना केरळ येथील साधक प्रेमाने ‘अम्मा’ असे म्हणत असत.

सनातनचे १२८ वे संतपद प्राप्त करणार्‍या कै. पू. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल (वय ८२ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

अनेक वर्षांपासून आजी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून नामजप करायच्या. उतारवयात आश्रमजीवन अंगीकारूनही अनेक गुणांमुळे त्या सेवाकेंद्रातील जीवनात समरस झाल्या होत्या.

हा दिव्याखाली अंधार नव्हे काय !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’

गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक

गुरूंविषयी आपली खात्री जितकी दृढ तितकी प्रचीती खात्रीपूर्वक मिळते ! – प.पू. भक्तराज महाराज