त्यागी वृत्ती असणार्‍या कोची, केरळ येथील कै. (श्रीमती) सौदामिनी कैमल (वय ८२ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल

रामनाथी (गोवा) – प्रेमभाव, त्यागी वृत्ती आणि अनेक गुणांचा समुच्चय असणार्‍या केरळ येथील सनातनच्या साधिका कै. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल (देहावसान : ६.७.२०२४) या सनातनच्या १२८ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी एका संदेशाद्वारे दिली.

कै. कैमलआजी मागील ८ वर्षे केरळमधील कोची येथील सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करत होत्या. पू. कैमलआजींची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा होती आणि त्यांच्याप्रती पुष्कळ समर्पितभाव अन् कृतज्ञताभाव होता. गेल्या १ वर्षापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्या शेवटपर्यंत अखंड नामजप करत होत्या. पू. कैमलआजी यांना केरळ येथील साधक प्रेमाने ‘अम्मा’ असे म्हणत असत.