पुणे – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या विरोधात वाशिम येथे छळाची तक्रार प्रविष्ट केली आहे. वाशिम पोलिसांनी ती तक्रार सध्या चौकशीसाठी ठेवल्याची माहिती आहे. ‘पुण्याच्या जिल्हाधिकार्यांनी मला त्रास दिला’, असा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे. खेडकर यांची पोलीस उपअधीक्षकांनी ३ घंटे चौकशी केली. त्यानंतर पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस पूर्ण करणार आहेत. त्यानंतर डॉ. सुहास दिवसे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.