केरळ येथील साधिका पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल (वय ८२ वर्षे) यांच्या निधनानंतर सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !

‘८.७.२०२४ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये केरळ येथील सनातनच्या साधिका श्रीमती सौदामिनी कैमल यांचे ६.७.२०२४ च्या रात्री वार्धक्याने देहावसान झाल्याचे वृत्त माझ्या वाचनात आले. तेव्हा देवाच्या कृपेने श्रीमती सौदामिनी कैमल यांच्या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे येथे लेखबद्ध केली आहेत.

दिवशी पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल

१. ‘कैमलआजी संत झाल्या आहेत’, असे विचार येणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

श्रीमती कैमलआजी यांच्या देहत्यागापूर्वी एक आठवड्यापासून ‘आजींची आध्यात्मिक उन्नती होऊन ‘त्या ‘पूजनीय’, म्हणजे संत झाल्या आहेत’, असे विचार माझ्या मनात येत होते.

२. कैमलआजींना त्यांच्या मृत्यूची पूर्वसूचना मिळणे

कैमलआजींची आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे ‘त्यांनी काळाचा पडदा ओलांडून भविष्य पाहिले असून ‘त्यांना त्यांच्या मृत्यूची पूर्वसूचना मिळाली होती’, असे मला जाणवले. (हो. हे सूत्र बरोबर आहे. त्यांनी ५.६.२०२४ या दिवशी त्यांच्या मुलाला, श्री. नंदकुमार यांना सांगितले होते की, तो जेव्हा गोवा येथील शिबिर संपवून पुन्हा केरळ येथील सेवाकेंद्रात येईल, तेव्हा मी नसणार !’ – सुश्री प्रणिता सुखटणकर, केरळ येथील साधिका)

३. कैमलआजींची साधना विविध योगमार्गांनुसार झालेली असणे

कैमलआजींची साधना प्रामुख्याने ‘भक्तीमार्गा’नुसार झाली असून श्री गुरुकृपेमुळे त्यांच्या साधनेला ‘ध्यानयोग’ आणि ‘ज्ञानयोग’ यांचीही जोड मिळाली होती.

३ अ. विविध योगमार्गांनुसार साधना झालेल्या कै. कैमलआजींची त्या योगमार्गांशी निगडित असणारी सूक्ष्मातून जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

टीप १ – ‘हो, ही सर्व सूत्रे बरोबर आहेत.’ – श्री. नंदकुमार कैमल (कैमलआजींचे सुपुत्र) आणि सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर, केरळ येथील साधिका

टीप २ –  कैमलआजींनी सांगितलेली अनेक सूत्रे खरी होत होती. यावरून ‘त्यांना ‘वाचासिद्धी’ प्राप्त झाली होती’, हे सूत्र सुस्पष्ट होते. त्यामुळे त्यांना ज्ञानयोगानुसार ‘वाचस्पती’ ही अवस्था प्राप्त झाली होती. (‘हो, मीसुद्धा हे अनेक प्रसंगांत अनुभवले आहे.’)

– सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर, केरळ येथील साधिका)

४. कैमलआजींवर देवतांची कृपा झालेली असणे

श्री. नंदकुमार कैमल

४ अ. आजींची बाळकृष्णावर पुष्कळ भक्ती असणे : आजींची बाळकृष्णावर पुष्कळ भक्ती होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये वात्सल्यभाव निर्माण होऊन त्यांची भगवंताप्रती ‘वात्सल्यभक्ती’ जागृत झाली होती. हे सूत्र लिहिण्यापूर्वी मला ‘आजींच्या मांडीवर बाळकृष्ण बसलेला दिसला आणि त्या त्याला प्रेमाने लोण्याचा गोळा भरवत आहेत’, असे सूक्ष्मातून दृश्य दिसले. (‘आईची श्री गुरुवायूरच्या बाळकृष्णावर पुष्कळ श्रद्धा होती. ती अनेक वर्षे त्या मंदिरात जाऊन बाळकृष्णाचे दर्शन घ्यायची आणि वरीलप्रमाणे ‘बाळकृष्ण तिच्याशी खेळत आहे’, अशी तिला अनुभूती यायची.’ – श्री. नंदकुमार कैमल (श्रीमती कैमलआजींचे सुपुत्र))

४ आ. ‘एक देवी कै. कैमलआजींना जनलोकाच्या पुढे देवीलोकात घेऊन जात आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसणे :  आजींच्या देहत्यागाची वार्ता समजताच मला ‘केस सोडलेली आणि काळ्या रंगाची कांती असलेली एक देवी आजींना जनलोकाच्या पुढे देवीलोकात घेऊन जात आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसले. ‘ही देवी कालीदेवी आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवले. त्याचप्रमाणे ‘आजी त्यांच्या कुलदेवीशी एकरूप होत आहेत, म्हणजे त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली असून त्यांचा लिंगदेह देवीच्या सगुण रूपात विलीन होऊन मोक्षप्राप्तीसाठी पुढील साधना करत आहे’, असे मला जाणवले. (‘आमची कुलदेवी श्री भद्रकालीदेवी आहे. आईची तिच्यावर पुष्कळ श्रद्धा होती आणि तिने अनेक वर्षे देवीची उपासना केली होती.’ – श्री. नंदकुमार कैमल)

४ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणे : आजींची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा होती आणि त्यांच्याप्रती पुष्कळ समर्पितभाव अन् कृतज्ञताभाव होता. त्यामुळे त्यांची मायेतील आसक्ती न्यून होऊन त्या पूर्णपणे आश्रमजीवनात रमल्या होत्या. त्यांच्या मनात मायेतील विचार न येता सतत सत्चे, म्हणजे भगवंत आणि साधना यांच्या संदर्भातील विचार येत होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणार्‍या साधकांच्या मनातील अनावश्यक, नकारात्मक आणि मायेतील विचार न्यून होऊन साधनेचे विचार प्रबळ होत होते.

५. ‘कै. कैमलआजींची वाटचाल संतपदाकडे आणि निर्गुणाकडे झाली आहे’, असे जाणवणे

कैमलआजींवर गुरुदेवांसह अनेक देवतांची कृपा असल्यामुळे त्यांचा सहवास हा केवळ सहवास न जाणवता ‘त्यांचा सहवास हा दैवी सत्संग आहे’, असे साधकांना जाणवायचे. यावरूनच ‘आजी संत झाल्या आहेत’, याची प्रचीती येते.

देहत्यागापूर्वी त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सगुण चैतन्य कार्यरत होते, तर देहत्यागानंतर त्यांच्या लिंगदेहामध्ये पुष्कळ प्रमाणात निर्गुण तत्त्व कार्यरत होऊन ‘त्यांचा सूक्ष्मातील प्रवास सगुणातून निर्गुणाकडे चालू झाला आहे’, असे जाणवते.

६. भावसुमनांजली !

आजी,
तुमचे रूप आहे देवीसमान ।
तुमचे स्वरूप आहे देवासमान ।
तुमचे ज्ञान आहे गुरुदेवांसमान ।
तुमची प्रीती आहे ईश्वरासमान ।।

कृतज्ञता : ‘गुरुदेवांच्या कृपेने हे सूक्ष्म परीक्षण करता आले’, यासाठी मी श्री गुरुचरणी लक्ष लक्ष वेळा कृतज्ञतापुष्प अर्पण करते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.