शरद पवार गटाच्या आव्हानाला उत्तर द्या !
अजित पवार गटाला न्यायालयाचे आदेश
नवी देहली – राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याविरोधात शरद पवार गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘या आव्हानावर दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करावे’, असे आदेश १६ जुलै या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने अजित पवार गटाला दिले. या संदर्भातील पुढील सुनावणी ६ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.
दादर येथे दूध चोरणार्याला पकडले !
मुंबई – दादरच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक जण प्रतिदिन एक दुधाची पिशवी चोरत होता. आरंभी लोकांना मांजरीवर संशय होता; परंतु व्यावसायिक संकेत गोलतकर यांनी सापळा रचून त्या चोराला रंगेहात पकडले. ते एका झाडामागे लपून बसले. तेवढ्यात नेहमीप्रमाणे चोर आला आणि दुधाची पिशवी घेऊन पळू लागला. गोलतकर यांनी त्या चोराचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.