बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा !

बैठकीस उपस्थित प्रशासकीय अधिकारी

अलिबाग (रायगड) – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, परिवहन विभाग येथील अधिकारी उपस्थित होते. बकरी ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर कायद्यानुसार असलेल्या प्रावधानांचे पालन करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. या अंतर्गत खोपोली नगर परिषद हद्दीमध्ये १, कर्जत ग्रामीणमध्ये ३ आणि पनवेल महापालिका क्षेत्रात ४ ठिकाणी तात्पुरत्या कुर्बानी केंद्रांना अनुमती देण्यात आले आहे.