गेल्या ५ वर्षांत ० ते १८ वर्षे वयोगटातील १५ सहस्र २६२ मुलांचा मृत्यू !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सहस्रावधी संख्येत बालमृत्यू होतात, याचा सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने विचार करायला हवा !

भोजशाळेच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

धार येथील भोजशाळेच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येणार्‍या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाविरुद्धच्या मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

चीनने अरुणाचल प्रदेशमधील ३० ठिकाणांची नावे पालटली !

आता भारताने संपूर्ण तिबेटवर भारताचा अधिकार असल्याचे सांगून त्याची राजधानी ल्हासा, तसेच शिगात्से, शान्नान, कामडो, ग्यात्न्से आदी प्रमुख शहरांची नावे पालटली पाहिजेत.

नांदुरा (जिल्हा बुलढाणा) येथे शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक !

छत्रपतींच्या महाराष्ट्रातच त्यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक होणे पोलिसांना लज्जास्पद !

पाठ्यपुस्तकांत वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख रुपयांचा अतिरिक्त भार !

इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख २६ सहस्र रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.

US On Khalistani Pannu : अमेरिकेत भाषण स्वातंत्र्य असल्याने आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्यावर कारवाई होऊ शकत नाही ! – अमेरिका

भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील नेत्यांना ठार मारण्याची धमकी देता येते, हे अमेरिकेकडूनच आता जगाला शिकावे लागेल ! खलिस्तानवाद्यांच्या माध्यमांतून भारतावर दबाव आणण्याचाच प्रयत्न अमेरिका करत आहे, हेच यातून स्पष्ट होते.

स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट दाखवा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा

ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय ४० कोटी रुपयांना विकली !

भारतात गायींचे सरासरी मूल्य २ सहस्र ५०० रुपये ते ११ सहस्र रुपये आहे; पण दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली.

लग्नाला नकार दिल्याने मुंबईत धर्मांधाचे युवतीवर आक्रमण !

युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतल्यास त्या वासनांध धर्मांधांच्या आक्रमणाला युवती चोख प्रत्युत्तर देऊ शकतील !

केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी !

मद्य धोरण प्रकरणात २१ मार्चपासून कारागृहात असलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘ईडी’ची कोठडी संपली असून त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.