|

बुलढाणा – छत्रपती शिवाजी महाराज यांची २८ मार्चला तिथीप्रमाणे जयंती होती. यानिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नांदुरा येथे सकाळी मोटारसायकल फेरी आणि सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी मोटारसायकल फेरी काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी अंबादेवी गड देवगड येथून मिरवणुकीला आरंभ झाला. मिरवणूक मोतीपुरा भागातून जात असतांना अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत मोतीपुरा येथील राज संतोष सोनोने हा तरुण घायाळ झाला. या वेळी काही पोलीस कर्मचार्यांनाही दगडांचा मार बसला. (पोलीसच जर सुरक्षित नसतील, तर ते जनतेचे रक्षण कसे करणार ? हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करण्याचे धाडस गेली अनेक वर्षे केले जात आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी युद्धपातळीवर वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत. यापुढे कुणाही समाजकंटकांकडून असे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे ! – संपादक)
सौजन्य Loknayak News (लोकनायक न्युज)
पोलीस ठाण्याचे प्रमुख विलास पाटील यांनी आयोजकांची समजूत घालून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरळीत चालू झाली; मात्र आठवडा बाजाराकडून येणार्या रस्त्याकडून पुन्हा मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यानंतर दुसर्या गटानेही दगडफेक करण्यास चालू केल्यानंतर सर्वत्र पळापळ चालू झाली. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विलास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परीस्थिती आटोक्यात आणली. या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात एकून १०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद करून आतापर्यंत एकूण १६ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतरही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
संपादकीय भूमिकाछत्रपतींच्या महाराष्ट्रातच त्यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक होणे पोलिसांना लज्जास्पद ! |
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !