पाठ्यपुस्तकांत वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख रुपयांचा अतिरिक्त भार !

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख २६ सहस्र रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. राज्यशासनाने हा निधी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला दिला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये वह्यांची पाने जोडण्याचा प्रयोग शासनाकडून प्रथमच करण्यात आला आहे; मात्र त्याचा अतिरिक्त आर्थिक भार पहाता पुढील शैक्षणिक वर्षातही हा प्रयोग करण्यात येईल का ? याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.