मुंबई – सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी १६ मार्च या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘ज्या सरकारचे सनातन धर्माशी नाते आहे, त्या सरकारशी मी जोडले गेले, याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. मागील ३५ वर्षांहून अधिक काळ मी भक्तीगीते गात आहे. ‘‘प्रारंभी मी सिनेसृष्टीतही गायले. त्यानंतर मी केवळ भक्तीगीतेच म्हणत आहे. अनेकदा मी घेतलेला निर्णय योग्य कि अयोग्य ? असा मला प्रश्न पडायचा; मात्र समाधान या गोष्टीचे आहे की, रामलल्लाची स्थापना झाली तेव्हा मला तेथे ५ मिनिटांसाठी गाणे म्हणता आले. त्यामुळे माझा निर्णय योग्यच होता’’, अशी भावनाही या वेळी पौडवाल यांनी व्यक्त केली.