पुणे – शहरातील उच्चभ्रू ‘कोरेगाव पार्क’ भागातील ‘विवा स्पा सेंटर’च्या दारात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कुरळे यांचा मृतदेह आढळून आला. इमारतीच्या जिन्यांवरून पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी अकस्मात् मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुरळे हे पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात नेमणुकीस होते. शिपाई म्हणून भरती झालेले कुरळे पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षक बनले. १५ मार्च या दिवशी रात्री ११ वाजता कोरेगाव पार्क गल्ली नं. ७ मध्ये आले. या ठिकाणी एका इमारतीतील ‘विवा स्पा सेंटर’मध्ये गेले; परंतु सेंटर बंद होते. कुरळे त्याच जिन्याने वरच्या मजल्यावर गेले; मात्र मजला चढत असतांना त्यांचा तोल गेला.