कोल्हापूर – मोटार वाहन कायद्यातील प्रावधानांची पूर्तता ओला, उबेर यांसह अन्य ॲपद्वारे सेवा पुरवणार्या आस्थापनांकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवाना नाकारल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून ओला, उबेर या ‘ॲप’द्वारे टॅक्सीसेवा पुरवणार्या टॅक्सीचालकांवर धडक कारवाई करण्यास प्रारंभ केला. परिवहन विभागाच्या कठोर कारवाईच्या धास्तीने ‘ॲप’द्वारे सेवा देणार्या ‘टॅक्सी’ रस्त्यावरून गायब झाल्या.
१५ मार्चला परिवहन विभागाने ४० हून अधिक टॅक्सींवर कारवाई केली. अचानक टॅक्सींची संख्या अल्प झाल्याने विमानतळ, तसेच अन्य काही ठिकाणांहून इतरत्र जाणार्या प्रवाशांना तात्काळ वाहने उपलब्ध झाली नाहीत.
संपादकीय भूमिका :परिवहन विभागाने नेहमीच अशी भूमिका घेणे आवश्यक आहे ! |