महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलनास संमिश्र प्रतिसाद !

मराठा समाजाला ‘ओबीसी’त आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात ‘रस्ता बंद’ आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या या आंदोलनाला राज्यातील बहुतांश शहरांत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. 

नाशिक येथे आर्थिक वादातून आधुनिक वैद्यांवर प्राणघातक आक्रमण !

कुठल्याही वादातून थेट समोरच्याची हत्या करण्याची बोकाळलेली विकृती समाजाच्या अधोगतीचे निर्देशक आहे. समाजातील ही असुरक्षितता संपवण्यासाठी कडक शासनासमवेत समाजाला धर्माचरणी करणे, हाच उपाय आहे !

चहापाण्याचा व्यय द्या, खिडकीतून कॉपी पुरवतो, पोलिसांची अडचण नाही ! – विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणार्‍या तरुणाचे वक्तव्य

शैक्षणिक क्षेत्रातील अनैतिकता गंभीर आहे. असे विद्यार्थी पुढे देशाचे आदर्श ठरतील का ? त्यामुळे असे प्रकार न होण्यासाठी शिक्षण मंडळाने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह शिक्षकांवर बडतर्फ आणि फौजदारी कारवाई केली पाहिजे !

परीक्षेचे प्रवेश पत्र न देणार्‍या शाळांवर कारवाई होणार !

बारावी बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे शुल्क भरले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र देण्यास टाळाटाळ करू नये, अशा सूचना राज्य मंडळांनी दिल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील धरणांत केवळ ४० टक्के पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४.८८ टी.एम्.सी. अल्प पाणीसाठा !

पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत मिळून २३ फेब्रुवारीपर्यंत केवळ ७९.५२ टी.एम्.सी. एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ ४०.०९ टक्के इतके आहे.

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी १८ फेब्रुवारी या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे आणि सौ. स्नेहा भोवर यांनी सांगितला.

राज्यातील गडकोटांच्या विकासाला चालना मिळेल ! – गिरीश महाजन, पर्यटनमंत्री  

मराठी साम्राज्याचा इतिहास राज्यातील ४०० हून अधिक गडकोटांभोवती फिरतो. आपल्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा होत आहे.

Ukraine Appeal To India : युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक !

युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री इरिना बोरोव्हेट्स यांचे भारताला आवाहन !

संदेशखाली येथे गावकर्‍यांनी तृणमूल काँग्रेसचा नेता अजित मैती याला चोपले !

मुळात हिंदु महिलांच्या शीलरक्षणाविषयी कोणतीच संवेदनशीलता नसणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता ‘या आक्रमणामागे हिंदुत्ववादी शक्ती आहे’, अशी आवई उठवली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Karnataka Temple Tax Bill Rejected : कर्नाटकातील मंदिरांवर कर लावणारे विधेयक विधान परिषदेने फेटाळले !

काँग्रेस सरकारला चपराक !