पंचनामा करतांना अनेक गोष्टी पंचांनी नमूद केल्या नाहीत ! – अधिवक्ता अनिल रुईकर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित अमोल काळे यांच्या संदर्भातील काही घटनांची साक्ष पंच बाबूराव जाधव यांनी १५ फेब्रुवारीला न्यायालयात नोंदवली. या संदर्भात संशयितांनी जे निवेदन केले, असे सांगण्यात आले त्याचा वेगळा पंचनामा करण्यात आला नाही.

सिंहगडाच्या तटबंदीवरून कचर्‍याचा कडेलोट, वनविभागाची बघ्याची भूमिका !

गडदुर्गांच्या स्वच्छतेविषयी वनविभागाने उदासीन असणे गंभीर आणि संतापजनक !

पोलीस ठाण्यात तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा नोंद !

या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक सचिन जाधव यांसह सोसायटीतील आबनावे कुटुंबातील ३ जण, डॉ. पाचारणे यांच्यासह इतर १५ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सनातनचे साधक डॉ. सुरज जाधव यांना विद्यावाचस्पती (पीएच्.डी.) पदवी प्रदान !

पशूविज्ञान आणि दुग्धशास्त्र (ॲनिमल सायन्स अँड डेअरी सायन्स) या विभागाची ही पदवी आहे. 

तुर्भे येथील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी शिवसेनेकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा !

वेश्या व्यवसायासारख्या गंभीर सामाजिक समस्या न सोडवणारे प्रशासन जनहिताचे निर्णय कसे घेणार ?

मुंबईत पाणीकपात ?

१ मार्चपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात होऊ शकते. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या सातही तलावांतील पाणीसाठा वेगाने अल्प होत आहे. त्यांत केवळ ४८ टक्के पाणीसाठा उरला आहे.

पुणे येथील ‘ससून’मधून आरोपी लीलाकर पसार झाल्याप्रकरणी २ पोलीस शिपाई निलंबित !

कर्तव्यचुकार पोलिसांमुळे आरोपी पळून जाणे गंभीर आणि संतापजनक !

अल्पवयीन मुलीला शिक्षिकेकडून मारहाण !

कोलशेत येथील शिक्षिका तिच्याकडे घरकाम करणार्‍या ११ वर्षीय मुलीला बेदम मारहाण करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समाजात सुसंवाद घडवणे पीठाचे काम ! – शिवस्वरूप भेंडे, सचिव, करवीर पीठ

हिंदूंच्या धर्मपीठावर आघात केल्यावर जे धर्मरक्षणासाठी उभे राहिले, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्याच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांचा गौरव करण्यात येत आहे.

मायणी (सातारा) पोलीस ठाण्यात शासनाधीन असलेल्या दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी !

यामध्ये विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कह्यात घेतलेल्या गाड्या होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.