खारघर येथे ‘अश्वमेध महायज्ञा’च्या हवन कुंडाच्या प्रकटीकरणासाठी विशेष पूजा पार पडली !

अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघर सेंट्रल पार्क मैदानामध्ये मुंबई ४७ व्या अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत महायज्ञ होणार आहे.

आपापसांतील हेवेदावे विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र येणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माची सध्याची स्थिती पहाता हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपापसांतील हेवेदावे विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी त्यांच्या ..

रायगड जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष निळकंठ घरत यांचे निधन

शोभीवंत फुग्यामध्ये हवा भरत असतांना त्याचा स्फोट होऊन घरत घायाळ झाले होते. यात ते ६० ते ७० टक्के भाजले.

दादर-पंढरपूर एक्सप्रेस मिरज-सांगलीमार्गे सातार्‍यापर्यंत धावणार !

ही गाडी रविवार, सोमवार आणि शुक्रवार अशी ३ दिवस आहे. ही गाडी पंढरपूर येथून निघून सांगोला, ढालगाव, जत रोड, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लाेस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, कोरेगाव आणि सातारा अशी स्थानके घेईल.

१ सहस्र ३५० श्रीरामभक्तांना १ सहस्र रुपयांत अयोध्या दर्शन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील १ सहस्र ३५० श्रीरामभक्तांना भाजपच्या वतीने पहिल्या टप्प्यात अयोध्या दर्शन घडवण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेकडून २ दिवसांमध्ये १५० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध !

उद्यान, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, पथ, विद्युत विभागांसमवेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून लहान-मोठ्या कामांच्या निविदा काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 

पतित पावन संघटनेने महाराष्ट्रातील १२६ पोलिसांना न्याय मिळवून दिला !

पतित पावन संघटनेच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यात आला आणि प्रशिक्षणाचे पत्र मिळवून दिले.

आज लातूर येथे ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

‘जय श्रीराम’ची घोषणा दिल्याच्या कारणावरून कोल्हापूर येथील शालेय बसवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हावी, या आणि अन्य घटनांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीत ब्रिगेडियर एस्.व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ या वीर योद्ध्यांच्या मुलाखतीतून उलगडली कारगील युद्धाची कथा  !

जम्मू आणि काश्मीरमधील आणि समुद्रसपाटीतून १९ सहस्र फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल स्थितीत कारगिलचे युद्ध भारताने वीर सैनिकांमुळे जिंकले.