सातारा येथे विज्ञापन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये फलक लावणार्‍यांना ४० सहस्र रुपयांचा दंड !

सातारा नगरपालिकेने विज्ञापन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विज्ञापनांचे फलक लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पालिकेने या फलकांविषयी ४० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा ३ टी.एम्.सी.ने अल्प झाल्याने पुणे महापालिकेसमोर पाणीसाठ्याच्या नियोजनाचे आव्हान !

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे पुणे शहरात पाण्याची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत थोडीशी बिकट आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये खडकवासला धरण साखळीत आजच्या दिवशी २०.२६ टी.एम्.सी. पाणीसाठा शिल्लक होता.

४० टक्के विद्यार्थी किंवा पालक यांनी अंड्याला विरोध केल्यास विद्यार्थ्यांना फळे देण्यात येतील !

शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात अंडी देण्याच्या निर्णयाला शहरातील धार्मिक संस्थांनी विरोध केला.

संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या निमित्ताने झालेल्या शासकीय महापूजेस पालकमंत्र्यांची उपस्थिती !

संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज पौष वारीनिमित्त झालेल्या शासकीय महापूजेस सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संत श्रीनिवृत्तीनाथांच्या मूर्तीचे पूजन केले.

महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवराय यांच्याविषयी खरा इतिहास लिहावा ! – डॉ. ओमेंद्र रत्नू, लेखक

‘महाराणा प्रताप एक सहस्र वर्षांचे धर्मयुद्ध’ पुस्तकाचे पुणे येथे झाले प्रकाशन !

‘गीता परिवारा’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन लर्न गीता’ उपक्रम

वर्ष १९८६ मध्ये प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी ‘गीता परिवारा’ची स्थापना केली. या माध्यमातून अनेक शिबिरांचे आयोजन त्याचप्रमाणे संस्कार केंद्रांचे व्यवस्थापन केले जाते.

सुशासन निर्देशांकात रायगड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर !

सामान्य प्रशासनाच्या वतीने ‘सुशासन निर्देशांक’ प्रसिद्ध करण्यात आला. यात रायगड जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून गोंदिया दुसर्‍या, तर नाशिक तिसर्‍या क्रमांकावर आहे.

याशनी नागराजन् या सातारा जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी !

याशनी नागराजन् या वर्ष २०२० च्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या (आय.ए.एस्.) अधिकारी आहेत.

श्री रामललाच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या रेल्वेमध्ये जळता भ्रमणभाष फेकला !

श्री रामललांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या ‘आस्था स्पेशल ट्रेन’मध्ये ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने जळता भ्रमणभाष फेकला.

कल्लड्क (कर्नाटक) येथे २ क्विंटल गोमांस जप्त : २ जणांना अटक

बजरंग दल कल्लड्क प्रभागाच्या माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्‍या २ जणांना अटक केली.