अयोध्येतील श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा !

अयोध्येत प्रभु श्रीराममंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर देशभरात कट्टरतावादी धर्मांधांकडून येनकेन प्रकारेण हिंदूंवर आक्रमणे करण्यात येणे, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, देशविरोधी भावना निर्माण करणे..

माघ यात्रेसाठी पंढरपूर येथे अडीच लाखांहून अधिक वारकर्‍यांची उपस्थिती !

२० फेब्रुवारीला झालेल्या माघ यात्रेसाठी पंढरपूर वारकर्‍यांच्या उपस्थितीने भरून गेले असून यात्रेसाठी अडीच लाखांहून अधिक वारकरी उपस्थित आहेत. या वारीसाठी गेल्या २ दिवसांपासून भाविकांनी गर्दी करण्यास प्रारंभ केला होता.

देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट

येथील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘जागतिक पुस्तक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’च्या वतीने होणारे ठिय्या आंदोलन आणि भजन आंदोलन स्थगित !

माघवारी २०२३ मध्ये जे वाटप करण्यात आले, त्याप्रमाणे वर्ष २०२४ मध्येही करण्यात आले. त्यामुळे यापुढील काळातही तसेच जागा वाटप करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून एकाने लाच मागितली !

लाचखोरांवर त्याच वेळी कठोर कारवाई न केल्याने असे गंभीर गुन्हे पुन: पुन्हा घडत आहेत. भ्रष्ट पोलीस यंत्रणा कधी सुधारणार ?

पुणे येथील येरवडा भागामध्ये टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड !

पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !

मराठीला ‘अभिजात’चा दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची पंतप्रधानांकडे मागणी !

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीचे वृत्त केंद्र सरकारच्या भारतीय साहित्य अकादमीकडून संस्कृती विभागाकडे सादर होऊनही संस्कृती विभागाकडून या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई होत आहे.

हवालातील पैशांपैकी ४५ लाख रुपये लुटणारे पोलीस कर्मचारी निलंबित !

अशा पोलिसांवर केवळ निलंबनाच्या ऐवजी बडतर्फीची कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

२ दिवसांच्या कारवाईत पुणे येथे १ सहस्र १०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त !

अमली पदार्थ विक्री करण्याचे प्रकार पोलिसांनी काही प्रमाणात उघडकीस आणले असूनही अद्याप कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ सापडतात

ज्ञानयोगी पू. अनंत बाळाजी आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या मराठी लघुग्रंथाचे लोकार्पण !

सनातनच्या साधकांचे सौभाग्य आहे की, त्यांना केवळ भक्ती आणि चित्तशुद्धी शिकवणारे नाही, तर या दोन्हींसाठी प्रयत्न करून घेणारे गुरु लाभले आहेत ! – पू. अनंत आठवले