येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण विनामूल्य ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री
जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.