दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डोंबिवली येथे तरुणाला मारहाण करणारे ३-४ जण अटकेत !; मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणार्‍या दोघांना अटक !

डोंबिवली येथे तरुणाला मारहाण करणारे ३-४ जण अटकेत ! डोंबिवली – मद्यपान केलेल्या ८ ते १० जणांनी एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी ३ ते ४ जणांना अटक केली आहे; मात्र मुख्य आरोपी मोकाट आहे. त्याच्याकडून मुलावर पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता असल्याने त्याच्या वडिलांनी तक्रार … Read more

महाबळेश्वर येथील डान्सबारवर पोलिसांची धाड !

सातारा येथे वारंवार डान्सबारवर धाडी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. तरीही अश्लील नृत्याचे प्रकार चालूच आहेत. पोलीस कठोर कारवाई करत नसल्याचे हे निर्देशक आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने प्रदर्शन

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आयुक्त कार्यालयाशेजारी विशेष दालन निर्माण केले आहे. आता राज्य उत्पादन शुल्क केंद्र या विभागाची सात मजली इमारत उभी राहिली आहे. येथे उभारलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

सायबर गुन्ह्यांत चोरलेले २४.५ कोटी रुपये संबंधितांना परत केले !

सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून नागरिकांना फसवल्यानंतर जे गुन्हे उघडकीस आले, त्या संबंधितांचे वर्षभरात २४.५ कोटी रुपये त्यांच्या खात्यांत जमा करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ही माहिती दिली आहे.

संकुलाला छत्रपती शिवरायांच्या नावाचा असलेला फलक काढण्यास शिवप्रेमींकडून विरोध !

व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन २ वर्षे झाली. महापालिका प्रशासनाला युवकांनी ‘व्यापारी संकुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल हेच नाव द्यावे’, अशा आशयाचे निवेदन देत गाळ्यांचे लिलाव करण्याची मागणी केली.

Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळणार !

विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मान्य !  

Tipu Sultan Cut-Out : टिपू सुलतानचा फलक हटवण्यास धर्मांध ‘डी.वाय.एफ्.आय.’चा नकार !

कर्नाटकात पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली

महिलांना सैन्याप्रमाणे तटरक्षक दलात पुरुषांच्या बरोबरीने का मानले जात नाही ? – सर्वोच्च न्यायालय

भारतीय तटरक्षक दलात महिलांना ‘कमिशन्ड ऑफीसर’ पद न दिल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. कमिशन्ड ऑफिसर हा सशस्त्र पदाचा सदस्य असतो. त्याला काही महत्त्वाचे अधिकार असतात. महिलांना तटरक्षक दलात हे पद न मिळाल्याने या अधिकारांना ते मुकतात.

२४ वर्षांचे अश्‍विन रामास्वामी अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या विधानसभेची निवडणूक लढवणार !

अश्‍विन रामास्वामी हे अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे सर्वांत अल्प वयाचे पहिले भारतीय-अमेरिकी बनले आहेत. रामास्वामी यांचे आई-वडील वर्ष १९९० मध्ये तामिळनाडू येथून अमेरिकेत आले. वर्ष २००० मध्ये जन्मलेले अश्‍विन हे ‘जनरेशन झी’ या पिढीतील आहेत.

Mankameshwar Metro Station : आगरा येथील जामा मशीद मेट्रो स्थानकाचे ‘मनकामेश्‍वर मेट्रो स्थानक’ असे नामांतर !

योगी सरकार आणि मेट्रो प्रशासन यांचा स्तुत्य निर्णय